Pages

 

Monday, March 1, 2010

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"
लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"
लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त करण
हे माझ्या जीवनातल उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोणाला समजलं नव्हत


   

वळुन पाहिले प्रत्येक वळणावर

वळुन पाहिले प्रत्येक वळणावर

कधी तरी तुझी साद येईल...
ना वाटले कधी प्रेम तुझे
इतक्या लवकर कच खाईल...

ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची...
तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची...

तु मात्र कधी जाणली नाहीस
किंम्मत त्या प्रेमाची...
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस
स्वप्न आपल्या प्रीतीची..

सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा...
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा...

अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते...
सहवासातले क्षण सोबतीला
आयुष्याची नाव हाकते..

जाणते आता कधीच येणार
तुझी ती प्रेमळ साद...
पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद... 

   

एकदा ती माझ्याकडे आली

एकदा ती माझ्याकडे आली 

एकदा ती माझ्याकडे आली 
माझ्याबरोबर चल म्हणाली  
हो म्हणायच्या आतच ती 
देऊन हात.घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत 
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे. चंद्रासंगत 
गोड गप्पा नव्हत्या थांबत 
सुरेल आवाज जणू कोकिळेगत 
मौनामध्ये भासे दीव्य एक रंगत 
अनवट सूर बसुरीचा उमलत
हसताना ती बाहुली दिसायची 
बारीक डोळे अलगद लाजायची 
गालावर खळी नाजूक पडायची 
नयन शिंपल्यात .जपावी वाटायची 
तरुतळी एका आम्ही  बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो
हात थरथरता तिच्या हातात 
परी नजर थेट डोळ्यात 
काय झाले पुढे सांगत नाही
स्वप्न सारे पुन्हा आठवायचे नाही
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी 
प्रेमामध्ये तर पडलो नाही ?