ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण ते शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुलं तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणंच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहीसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याचीच भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील
Tuesday, October 20, 2009
मनात नव्हतं गं पण ते होऊन गेलं
मनात नव्हतं गं
पण ते होऊन गेलं
माझं विचित्र वागणं
तुला दुखाऊन गेलं...
माझं तसलं वागणं
मला आता छळतय
माझं खरच चुकलं
मला आता कळतय...
तू मला बोलून घे
स्वतःला जाळू नकोस
काहीही शिक्षा कर
पण मला टाळू नकोस...
आता माझ्या जगण्याचं
तूच कारण आहेस
तुझं दूर जाणं म्हणजे
माझं मरण आहे...
पण ते होऊन गेलं
माझं विचित्र वागणं
तुला दुखाऊन गेलं...
माझं तसलं वागणं
मला आता छळतय
माझं खरच चुकलं
मला आता कळतय...
तू मला बोलून घे
स्वतःला जाळू नकोस
काहीही शिक्षा कर
पण मला टाळू नकोस...
आता माझ्या जगण्याचं
तूच कारण आहेस
तुझं दूर जाणं म्हणजे
माझं मरण आहे...
तुझ्या पापण्यांना रंग देउ मी कुठले.
तुझ्या पापण्यांना रंग देउ मी कुठले...?
जरा स्पर्श होता तु डोळेच मिटले...?
निथळले रंग सारे मी घट्ट बांधलेले...
त्याच रंगात होते मी हट्ट सांधलेले...
सांग ओलावले का ? रंग सारे तुझेही...
तप्त आभाळ सांग का डोळ्यात भिजले?
विझलेत दिप सारे विजांची उन्हेही...
दिले रंग मजला जरासे तिनेही...
तो रंग चांदण्याचा जरी त्यात होता
थेब अता मोजकेच या ओठात उरले....
ओल श्वासातुनी ऋतु गार वाहे...
तुझ्या नेत्री तरी का अंधार आहे...?
सांग पाहिलेस क?मघा तु मलाही...
रंग माझे तुझेही का गालात हसले...
जरा स्पर्श होता तु डोळेच मिटले...?
निथळले रंग सारे मी घट्ट बांधलेले...
त्याच रंगात होते मी हट्ट सांधलेले...
सांग ओलावले का ? रंग सारे तुझेही...
तप्त आभाळ सांग का डोळ्यात भिजले?
विझलेत दिप सारे विजांची उन्हेही...
दिले रंग मजला जरासे तिनेही...
तो रंग चांदण्याचा जरी त्यात होता
थेब अता मोजकेच या ओठात उरले....
ओल श्वासातुनी ऋतु गार वाहे...
तुझ्या नेत्री तरी का अंधार आहे...?
सांग पाहिलेस क?मघा तु मलाही...
रंग माझे तुझेही का गालात हसले...
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी मलाच हरवून बसलो
हात तुझा हातातून सुटताना
एक आधार गमावून बसलो
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तसं मी मनातही आणलं नव्हतं
वाटलं तू तरी ओळखशील मला
माझं दु:ख कोणीचं जाणलं नव्हतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुझा आरोप मला मान्य नाही
परीस्थितीने दगा दिला, नाहीतर
माझं प्रेम इतकं सामान्य नाही
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी इतका नाही गं अर्धवट
तुझं आयुष्य पुढे सुखी व्हावं
म्हणून केली ती सारी खटपट
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
एकनिष्ट मलाही रहायच होतं
पण नीयतीला कुठे आपल्याला
असं फुललेलं पहायच होतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुला दु:खां पासून दूर नेलेलं
पुढच्याच वळणावर
मी मलाच उद्धवस्त केलेलं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
परीस्थितीच अस्पृश्य होती
तुझ्या माझ्या मिलनाची
हातावरची रेषाच अदृश्य होती
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
नात्यात कधीच बहर नव्हता
एकमेकांसाठी तळमळण्याची
भावनेत कधीच कहर नव्हता
मी मलाच हरवून बसलो
हात तुझा हातातून सुटताना
एक आधार गमावून बसलो
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तसं मी मनातही आणलं नव्हतं
वाटलं तू तरी ओळखशील मला
माझं दु:ख कोणीचं जाणलं नव्हतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुझा आरोप मला मान्य नाही
परीस्थितीने दगा दिला, नाहीतर
माझं प्रेम इतकं सामान्य नाही
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी इतका नाही गं अर्धवट
तुझं आयुष्य पुढे सुखी व्हावं
म्हणून केली ती सारी खटपट
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
एकनिष्ट मलाही रहायच होतं
पण नीयतीला कुठे आपल्याला
असं फुललेलं पहायच होतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुला दु:खां पासून दूर नेलेलं
पुढच्याच वळणावर
मी मलाच उद्धवस्त केलेलं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
परीस्थितीच अस्पृश्य होती
तुझ्या माझ्या मिलनाची
हातावरची रेषाच अदृश्य होती
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
नात्यात कधीच बहर नव्हता
एकमेकांसाठी तळमळण्याची
भावनेत कधीच कहर नव्हता
शेवटी तु मला विसरलीसच
| शेवटी तु मला विसरलीसच पण मी कसा विसरु तुला कसा विसरु त्या जागवलेल्या रात्री कशा विसरु त्या आगीच्या ज्वाळा कशा विसरु त्या ह्रुदयातुन उठणाऱ्या कळा प्रितीच्या बदल्यात प्रीत मी कधीच मागितली नव्हती बस तु लग्नाला बोलावशील अशी अपेक्षा मात्र मी केली होती विश्वास ठेवला होता तुझ्यावर पण तुही सामान्यच निघालीस बस तुझ्या लग्नाला मी आलो असतो कोपऱ्यात उभा राहुन डोळाभर पाहिलं असतं लग्नानंतर पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो असतो तुझ्या वरातीत धुंद होउन नाचलो असतो. पण तु मात्र माझ्यावरच संशय घेतलास माझी प्रीत इतकी का कमजोर होती? आता मी तुला विसरणार आहे आज ना उद्या मी तुला विसरीन आतापर्यंत मी स्वतःला तुझ्या लायक समजत नव्हतो आतामात्र मला कळून चुकलय तुच लायक नाहीयेस माझ्या प्रीतीच्या मी फ़क्त खाली पडलोय मोडुन पडलो नाहीय मी पुन्हा उभा राहीन पण तुझ्यासाठी नाही ज्याच्यांवर कविता तयार होतात त्या व्यक्ती नशीबवान असतात आज तु कमनशीबी ठरलीस कारण ही कविता नाहीये हे माझे अश्रू आहेत. शेवटचे अश्रू |
दिल्यास् काही आठवणी अशा की...........
दिल्यास् काही आठवणी अशा की...........
गालवरती प्रेमाच्या कळ्या उमलतात.......
पण जेव्हा आठवण येते तुझ्या परकेपणाची
तेव्हा अपोआपच कोमेजुन् जातात.
दिल्यास् काही आठवणी अशा की...........
पावसाच्या सरी मनामद्ये खळखळुन् हसतात...........
पण् जेव्हा आठवन् होते तुझ्या स्वार्थीपणाची ...
तेव्हा त्या उन्हाने जणु हिरमुसुन् जातात
दिल्यास् काही आठवणी अशा की...........
सागरात जणु आनन्दाच्या लाटा उसळतात........
पण् जेव्हा आठवन् होते तुझ्या रुक्श बोलण्याची.........
तेव्हा त्या आल्या वाटेने परत् निघुन जातात.......
का दिल्यास् काही आठवणी अशा की ?..
ज्या तुझ्या सारख्याच
माझ्याशी लपन्डाव खेळत् राहतात.
कधीही शेवट न होण्याऱ्या क्शीतीज्यामागे
जीव खावुन धावयाला लावतात
गालवरती प्रेमाच्या कळ्या उमलतात.......
पण जेव्हा आठवण येते तुझ्या परकेपणाची
तेव्हा अपोआपच कोमेजुन् जातात.
दिल्यास् काही आठवणी अशा की...........
पावसाच्या सरी मनामद्ये खळखळुन् हसतात...........
पण् जेव्हा आठवन् होते तुझ्या स्वार्थीपणाची ...
तेव्हा त्या उन्हाने जणु हिरमुसुन् जातात
दिल्यास् काही आठवणी अशा की...........
सागरात जणु आनन्दाच्या लाटा उसळतात........
पण् जेव्हा आठवन् होते तुझ्या रुक्श बोलण्याची.........
तेव्हा त्या आल्या वाटेने परत् निघुन जातात.......
का दिल्यास् काही आठवणी अशा की ?..
ज्या तुझ्या सारख्याच
माझ्याशी लपन्डाव खेळत् राहतात.
कधीही शेवट न होण्याऱ्या क्शीतीज्यामागे
जीव खावुन धावयाला लावतात
तुझी आठवण आज आली..
तुझी आठवण आज आली..
डोळ्यांवरची पापणी ओली..
एक क्षण जात नाही..
तू मात्र येत नाहीस..
तू आली, तुच आलीस..
न पाहता निघून गेलीस..
पुन्हा वाट जुनीच आली..
तुझीच याद पुन्हा बोली..
दोघे पुन्हा भेटू तिथे..
नकार पहीला दिला तिथे..
ती जागा अमर झाली असती..
जर तू वळून आली नसतीस..
तु आलीस स्पर्ष घेवून
काही क्षण हर्ष होवून..
आज स्पर्ष विरला तिथे..
मी..
तुला सोडून आलो तिथे..
एक जन्म दिला आहे..
तुझाच स्पर्ष ओला आहे..
पुन्हा आभाळ भरुन दे..
ही रात्र माझी चोरुन ने..
रोज डोळे मिटतो जेंव्हा..
तुझी साथ लाभते तेंव्हा..
माझा शब्द रिता जरी..
माझी प्रित आहे खरी..
पुन्हा एकदा बहर दे..
एक मात्र नजर दे..
मी पुन्हा वळून पाहतो .. जरी..
सावली माझीच दिसते .. तरी.
आज मला एक नवीन मैत्रीण भेटली
आज मला एक नवीन मैत्रीण भेटली, अन मनात पुन्हा एकदा आनंदाची छाया दाटली
चेहरयावर होते तिच्या, स्मित हास्य गोड, सौंदर्याला नव्हती तीच्या, कशाचीच तोड़
चेहरयावर होते तिच्या, स्मित हास्य गोड, सौंदर्याला नव्हती तीच्या, कशाचीच तोड़
समोरासमोर भेटलो नाही, फोटोतच पाहीले, बोलायाचे बरेच होते, पण सारे मनातच राहीले
काही वेळाने कळाले, ती कमिटेड आहे, तरीही प्रेम करावे, हे मनाचे वेड आहे
काही वेळाने कळाले, ती कमिटेड आहे, तरीही प्रेम करावे, हे मनाचे वेड आहे
सांगा आता, मन खरच ना उधान वारयाचे, दोष स्वताला द्यावा, तर हेच गान सारयाचे!!!
काल भेटलेली मैत्रिण आजही ऑनलाइन आली
काल भेटलेली मैत्रिण आजही ऑनलाइन आली, तिला Available पाहून,मनाला चेतना आली,
तिने स्वताहून पिंग करण्याची बराच वेळ वाट पाहिली, तीही जणू बोलायचच नाही माझ्याशी, निशच्याशी ताठ राहिली,
मग मीच बोललो तिच्याशी,कशी आहेस ते विचारल, तिने स्वताहून बोलाव माझ्याशी, हे स्वप्न तात्पुरत नाकारल ,
तीच chatting वर उत्तर यायला तसा बराच वेळ लागला, मनही स्वताला प्रश्न विचारू लागले ,तू चुकीचे का काही वागला???
busy आहे आज जराशी,तेवढ्यात तिचे उत्तर आले, तू माझ्याशी बोलावेच असे,मानाने का ठरवले?
आज तुझ्याशी मला, काही वेळच बोलायचे होते, कारण BDay साठी माझे हेच सेलेब्रेशन होते!!!
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
का असा चिडून रोज अंत बघतेस माझा?
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
(काय आहे..)
रुक्मिणीचा प्रॉब्लेम होता भावाबरोबर घरी
सत्यभामा कटकट करते.. आधी होती बरी
बाकी सोळा हजार नुसती शरणार्थी प्रजा..
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
हेल्थ रीझन्ससाठी तुळस.. अं.. पित्त शमवायला..(?!)
ओठांवर मुरली धरली तुझंच मन रमवायला
रासक्रीडा? मी?? छे!! क्लोन असेल माझा!
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
भोळाभाबडा सापडलो म्हणून अशी रुसतेस!
तूच खरी अनयासोबत आनंदात दिसतेस!!
जीव तोडून प्रेम केलं त्याची ही सजा??
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
(काय आहे..)
रुक्मिणीचा प्रॉब्लेम होता भावाबरोबर घरी
सत्यभामा कटकट करते.. आधी होती बरी
बाकी सोळा हजार नुसती शरणार्थी प्रजा..
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
हेल्थ रीझन्ससाठी तुळस.. अं.. पित्त शमवायला..(?!)
ओठांवर मुरली धरली तुझंच मन रमवायला
रासक्रीडा? मी?? छे!! क्लोन असेल माझा!
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
भोळाभाबडा सापडलो म्हणून अशी रुसतेस!
तूच खरी अनयासोबत आनंदात दिसतेस!!
जीव तोडून प्रेम केलं त्याची ही सजा??
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
नेहमी तिचाच विचार
नेहमी तिचाच विचार, नेहमी तिचीच आठवण
का एका मैत्रिणी साठी मी इतके झुरतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतो ...
का त्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
'परदेशी चाललास पण मला विसरु नको'
का तो तिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते :(
का 'नक्की नाही' म्हणताना माझा आवाज खालावतो...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तिला एक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव घेता मी विषय बदलतो
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
हे प्रेम नाही मैत्रीच आहे, एकच उत्तर नेहमी
पण का ते खरे की खोटे असा प्रश्न मला पडतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
का एका मैत्रिणी साठी मी इतके झुरतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
चार चौघात मित्र मला तिच्या नावाने चिडवतो ...
का त्याचा प्रयत्न फसतो कारण खरतर मनात मी हसतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
'परदेशी चाललास पण मला विसरु नको'
का तो तिचा शेवटचा SMS मी परत परत वाचतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तू परत कधी येणार? ती रोज रोज विचारते :(
का 'नक्की नाही' म्हणताना माझा आवाज खालावतो...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तिला एक स्थळ आले, कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव घेता मी विषय बदलतो
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
हे प्रेम नाही मैत्रीच आहे, एकच उत्तर नेहमी
पण का ते खरे की खोटे असा प्रश्न मला पडतो ...
की खरच मी तिच्यावर प्रेम करतो?
तु एकदातरी माग वळायला हव होत...
माझ प्रेम तुला कळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत
तु हसतेस आज माझ्यावर
आणि मी आसवानी भिजलेला
दोन थेम्ब पाणी
तुझ्याहि डोळ्यातुन गळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत
दिल होतस वचन तु
मला सात्त जन्माच्या सोबतिच
निदान सात पावल तरी
तु माझ्यासोबत चालायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...
लावुन गेलिस आग
आता ही विझवनार कोन
माझ्यासारख थोडस
तुही जळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...
तु एकदातरी माग वळायला हव होत
तु हसतेस आज माझ्यावर
आणि मी आसवानी भिजलेला
दोन थेम्ब पाणी
तुझ्याहि डोळ्यातुन गळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत
दिल होतस वचन तु
मला सात्त जन्माच्या सोबतिच
निदान सात पावल तरी
तु माझ्यासोबत चालायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...
लावुन गेलिस आग
आता ही विझवनार कोन
माझ्यासारख थोडस
तुही जळायला हव होत
तु एकदातरी माग वळायला हव होत...
निळ्याशार आकाशात चांदणं झरत राहतं
निळ्याशार आकाशात चांदणं झरत राहतं
ॠतु कावराबावरा होतो ...... मन स्वप्नांमधे वाहतं
तुझ्या आठवांची पेरण केली ... की नेहमी असं होतं
डोळ्यांचं शेत फूलतं नी आसवांचं पीक येतं !!!!!!!!
हा चंद्रही असा वेडा ......
धड उगवत नही ... धड मावळत नाही
त्यातच काळीज फितूर झालय ....
तुझ्या आठवांची एकही संधी दवडत नाही
काय चाललंय तरी काय
हे कळायला मार्ग असावा लागतो ....
आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला
तुझा चेहरा दिसावा लागतो ....
ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय?
आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय?
तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा
नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ...
तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून
एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून ..... (!)
एकदातरी उभ्या आयुष्यात प्रेमाची फूंकर मारशील ना ??
अवघ्या अंगाची जळती ज्योत कधीतरी विझवशील ना ??
ॠतु कावराबावरा होतो ...... मन स्वप्नांमधे वाहतं
तुझ्या आठवांची पेरण केली ... की नेहमी असं होतं
डोळ्यांचं शेत फूलतं नी आसवांचं पीक येतं !!!!!!!!
हा चंद्रही असा वेडा ......
धड उगवत नही ... धड मावळत नाही
त्यातच काळीज फितूर झालय ....
तुझ्या आठवांची एकही संधी दवडत नाही
काय चाललंय तरी काय
हे कळायला मार्ग असावा लागतो ....
आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला
तुझा चेहरा दिसावा लागतो ....
ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय?
आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय?
तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा
नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ...
तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून
एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून ..... (!)
एकदातरी उभ्या आयुष्यात प्रेमाची फूंकर मारशील ना ??
अवघ्या अंगाची जळती ज्योत कधीतरी विझवशील ना ??
ती जाताना 'येते' म्हणून गेली
ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!
म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!
तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली
वार नखाचा हलके करून गेली...
घडे क्षणांचे रिते असे केले की
देहसुखाचा प्याला भरून गेली
कळते हा बगिचा का फुलला माझा
काल म्हणे ती दारावरून गेली!
तसे पाहता पाउस तितका नव्हता
कळे न का ती इतकी भिजून गेली...
तिच्या भोवती गंध अता दरवळतो
(सहवासचे अत्तर टिपून गेली!)
वचन मागतोे मी
काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण
लगेच कसे ओलखीचे झालो
वाटसरु आपण वेगळेवेगळे
आता सहजिवनाचे सोबती झालो...
निरगस तुझे बोलके डोळे
वेड मजसी लाउन गेले
भिडता नजर एकमेंकाशी
पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले...
मनमोकळा तुझा हसरा स्वभाव
जिवास मझ्या खुप भावला
समजणेच न मला आता
मज लळा तुजा कसा लगला ???
देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?
वचन मागतोे मी...
लगेच कसे ओलखीचे झालो
वाटसरु आपण वेगळेवेगळे
आता सहजिवनाचे सोबती झालो...
निरगस तुझे बोलके डोळे
वेड मजसी लाउन गेले
भिडता नजर एकमेंकाशी
पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले...
मनमोकळा तुझा हसरा स्वभाव
जिवास मझ्या खुप भावला
समजणेच न मला आता
मज लळा तुजा कसा लगला ???
देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा?
वचन मागतोे मी...
तू सांगितलंस ना मला....
तू सांगितलंस ना मला....
की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर,
तेव्हा खूप दुखलं गं ह्रदयात....
उगाच एक अनावर हुंदका दाटून आला गळ्यात....
कमीपणाची जाणीव आयुष्यात पहिल्यांदाच झाली....
पण बरंही वाटलं मनाला....
किमान तू माझी फसवणूक तर केली नाहीस म्हणून....
कारण तसे झाले असते, तर मी नक्कीच उध्वस्त झालो असतो....
माझ्या भावनांची तू कदर केलीस म्हणून आभार मानावेसे वाटतात तुझे...
एका कवीचा अंत, किती कुशलतेने टाळलास तू....
आणि माझ्या पदरात टाकून गेलीस धुरकटलेलं आभाळ,
आणि भरकटत गेलेली स्वप्नं....
की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर,
तेव्हा खूप दुखलं गं ह्रदयात....
उगाच एक अनावर हुंदका दाटून आला गळ्यात....
कमीपणाची जाणीव आयुष्यात पहिल्यांदाच झाली....
पण बरंही वाटलं मनाला....
किमान तू माझी फसवणूक तर केली नाहीस म्हणून....
कारण तसे झाले असते, तर मी नक्कीच उध्वस्त झालो असतो....
माझ्या भावनांची तू कदर केलीस म्हणून आभार मानावेसे वाटतात तुझे...
एका कवीचा अंत, किती कुशलतेने टाळलास तू....
आणि माझ्या पदरात टाकून गेलीस धुरकटलेलं आभाळ,
आणि भरकटत गेलेली स्वप्नं....
Wednesday, October 7, 2009
पाउस, आणी ती
पाउस, आणी ती
भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!
तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!
"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."
ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"
बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!
कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!
अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"
"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!
स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!
घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!
तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!
"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."
ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"
बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!
कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!
अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"
"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!
स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!
'लव' की प्रेम?
'लव' की प्रेम?
'लव' शब्दच कीती पोकळ,
'प्रेम' शब्दातच कीती बळ.
'लव' एक बेछुट अंधानुकरण,
'प्रेम' एक अतुट बंधन.
'लव' मनांची फ़सवणुक,
'प्रेम' मनांची जपणूक.
'लव' कोमेजलेला गंध,
'प्रेम' दर्वळलेला सुगंध.
'लव' नसमजून बोलणं,
'प्रेम' नबोलून समजणं.
'लव' मेसेज सरकवणं,
'प्रेम' मेसेज बनणं.
'लव' आंधळ करतं,
'प्रेम' बघायला शिकवतं.
म्हणूनच,
'प्रेम' नसलं तर काहीच नसतं,
'प्रेम' असलं तर सारकाही असतं,
'प्रेम' असलं तर जग असतं.
तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय?
'लव' की 'प्रेम'!
'लव' शब्दच कीती पोकळ,
'प्रेम' शब्दातच कीती बळ.
'लव' एक बेछुट अंधानुकरण,
'प्रेम' एक अतुट बंधन.
'लव' मनांची फ़सवणुक,
'प्रेम' मनांची जपणूक.
'लव' कोमेजलेला गंध,
'प्रेम' दर्वळलेला सुगंध.
'लव' नसमजून बोलणं,
'प्रेम' नबोलून समजणं.
'लव' मेसेज सरकवणं,
'प्रेम' मेसेज बनणं.
'लव' आंधळ करतं,
'प्रेम' बघायला शिकवतं.
म्हणूनच,
'प्रेम' नसलं तर काहीच नसतं,
'प्रेम' असलं तर सारकाही असतं,
'प्रेम' असलं तर जग असतं.
तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय?
'लव' की 'प्रेम'!
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
| हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही | ||||||||||
| हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही | ||||||||||
| हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर | ||||||||||
| निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी | ||||||||||
| हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही | ||||||||||
| डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही | ||||||||||
| हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली | ||||||||||
| याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही | ||||||||||
| हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड | ||||||||||
| तितके काही गाल पसरणे अवघड नाही | ||||||||||
| हसतो कारण दुसर्यानांही बरे वाटते | ||||||||||
| हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते | ||||||||||
| हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी | ||||||||||
| आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही | ||||||||||
| हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे | ||||||||||
| खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे | ||||||||||
| हसतो कारण सत्याची मज भिती नाही | ||||||||||
| हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... | ||||||||||
Subscribe to:
Comments (Atom)
