Pages

 

Monday, March 1, 2010

एकदा ती माझ्याकडे आली

एकदा ती माझ्याकडे आली 

एकदा ती माझ्याकडे आली 
माझ्याबरोबर चल म्हणाली  
हो म्हणायच्या आतच ती 
देऊन हात.घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत 
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे. चंद्रासंगत 
गोड गप्पा नव्हत्या थांबत 
सुरेल आवाज जणू कोकिळेगत 
मौनामध्ये भासे दीव्य एक रंगत 
अनवट सूर बसुरीचा उमलत
हसताना ती बाहुली दिसायची 
बारीक डोळे अलगद लाजायची 
गालावर खळी नाजूक पडायची 
नयन शिंपल्यात .जपावी वाटायची 
तरुतळी एका आम्ही  बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो
हात थरथरता तिच्या हातात 
परी नजर थेट डोळ्यात 
काय झाले पुढे सांगत नाही
स्वप्न सारे पुन्हा आठवायचे नाही
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी 
प्रेमामध्ये तर पडलो नाही ?


No comments:

Post a Comment