मनात नव्हतं गं
पण ते होऊन गेलं
माझं विचित्र वागणं
तुला दुखाऊन गेलं...
माझं तसलं वागणं
मला आता छळतय
माझं खरच चुकलं
मला आता कळतय...
तू मला बोलून घे
स्वतःला जाळू नकोस
काहीही शिक्षा कर
पण मला टाळू नकोस...
आता माझ्या जगण्याचं
तूच कारण आहेस
तुझं दूर जाणं म्हणजे
माझं मरण आहे...
Tuesday, October 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment