Pages

 

Tuesday, October 20, 2009

तुझी आठवण आज आली..


तुझी आठवण आज आली..
डोळ्यांवरची पापणी ओली..
एक क्षण जात नाही..
तू मात्र येत नाहीस..

तू आली, तुच आलीस..
न पाहता निघून गेलीस..
पुन्हा वाट जुनीच आली..
तुझीच याद पुन्हा बोली..

दोघे पुन्हा भेटू तिथे..
नकार पहीला दिला तिथे..
ती जागा अमर झाली असती..
जर तू वळून आली नसतीस..

तु आलीस स्पर्ष घेवून
काही क्षण हर्ष होवून..
आज स्पर्ष विरला तिथे..
मी..
तुला सोडून आलो तिथे..

एक जन्म दिला आहे..
तुझाच स्पर्ष ओला आहे..
पुन्हा आभाळ भरुन दे..
ही रात्र माझी चोरुन ने..

रोज डोळे मिटतो जेंव्हा..
तुझी साथ लाभते तेंव्हा..
माझा शब्द रिता जरी..
माझी प्रित आहे खरी..

पुन्हा एकदा बहर दे..
एक मात्र नजर दे..
मी पुन्हा वळून पाहतो .. जरी..
सावली माझीच दिसते .. तरी.

No comments:

Post a Comment