| हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही | ||||||||||
| हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही | ||||||||||
| हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर | ||||||||||
| निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी | ||||||||||
| हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही | ||||||||||
| डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही | ||||||||||
| हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली | ||||||||||
| याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही | ||||||||||
| हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड | ||||||||||
| तितके काही गाल पसरणे अवघड नाही | ||||||||||
| हसतो कारण दुसर्यानांही बरे वाटते | ||||||||||
| हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते | ||||||||||
| हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी | ||||||||||
| आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही | ||||||||||
| हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे | ||||||||||
| खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे | ||||||||||
| हसतो कारण सत्याची मज भिती नाही | ||||||||||
| हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... | ||||||||||
Wednesday, October 7, 2009
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment