Pages

 

Tuesday, October 20, 2009

काल भेटलेली मैत्रिण आजही ऑनलाइन आली

काल भेटलेली मैत्रिण आजही ऑनलाइन आली, तिला Available पाहून,मनाला चेतना आली,
 
तिने स्वताहून पिंग करण्याची बराच वेळ वाट पाहिली, तीही जणू बोलायचच नाही माझ्याशी, निशच्याशी ताठ राहिली,

मग मीच बोललो तिच्याशी,कशी आहेस ते विचारल, तिने स्वताहून बोलाव माझ्याशी, हे स्वप्न तात्पुरत नाकारल ,

तीच chatting वर उत्तर यायला तसा बराच वेळ लागला, मनही स्वताला प्रश्न विचारू लागले ,तू चुकीचे का काही वागला???

busy आहे आज जराशी,तेवढ्यात तिचे उत्तर आले, तू माझ्याशी बोलावेच असे,मानाने का ठरवले?

आज तुझ्याशी मला, काही वेळच बोलायचे होते, कारण BDay साठी माझे हेच सेलेब्रेशन होते!!!


No comments:

Post a Comment